गर्भाशयाच्या कॅन्सर रोखण्यासाठी हे माहीत हवंच!

डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ स्त्र‌यिांमध्ये गर्भाशयाचे कार्य आणि उपयुक्तता ही सर्वांनाच माहीत आहे. मुलीच्या जन्मापासूनच तिचे स्त्री बीज कार्यरत असते. स्त्री बीजाची संख्या किती असावी हे जन्माच्या वेळीच ठरलेलं असतं आणि जशी मुलगी मोठी होते तसे स्त्री बीजाची संख्या कमी होत जाते. वयात येताना मासिक पाळी सुरु होणं हा मोठा बदल मुलीमध्ये होतो. गर्भधारणा होणं, गर्भाशयाचा आकार वाढणं, बाळंतपण, चाळीशीनंतर पाळी बंद होणं या गोष्टी घडतात. नैसर्गिकपणे गर्भाशयासंबंधित सर्व क्रिया सुरळीत चालू असतात. पण त्यातही थोडे फार बदल होतात किंवा कधी-कधी जास्तच बिघाड होऊ शकतात. जसं पाळीच न येणं किंवा गर्भाशयात गाठी होणं, जास्त रक्तस्त्राव होणं या गोष्टी घडतात. जसं स्त्र‌यिांचं वय वाढतं तसं गर्भाशयाचे अनेक आजार उद्भवू शकतात. सगळ्याच स्त्र‌यिांमध्ये असे घडत नाही. पण ज्यांच्यामध्ये असे आजार दिसून येतात त्यांनी वेळेतच उपचार केले तर गंभीर आजार टळू शकतात. अति रक्तस्त्राव होणं स्त्र‌यिांना पाळीमध्ये अति रक्तस्त्राव होणं हे साधारणपणे वयाच्या ४० व्या वर्षापासून होऊ शकतं. गर्भाशयात फायब्रॉईड होणं, स्त्री बीजाचे आजार होणं, स्त्री बीजामध्ये गाठी होणं किंवा कॅन्सर होणं या कारणामुळे अति रक्तस्त्राव होऊ शकतो. या वयात सर्वात जास्त धोकेदायक आजार म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्त्री बीजाचा आणि गर्भाशयाचा होणारा कर्करोग. हे सर्वच स्त्रीमधील गर्भाशयाचे कॅन्सर, नियमितपणे स्वत:ची तपासणी केल्यास ते सहज टाळता येऊ शकतात आणि त्यांच्यावर उपचारसुध्दा करता येऊ शकतात. आपल्याकडे शहरामध्ये आरोग्यासंबंधी चांगली जनजागृती झाली आहे. पण खेड्यामध्ये अजून स्त्र‌यिा शिक्षणापासून वंचित असल्यामुळे त्यांना अशा आजाराची माहिती नसते आणि त्यामुळे त्या आजारांना बळी पडतात. गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे प्रमाण आजही आपल्या देशात खूप जास्त आहे. नियमित तपासून न घेणं आणि स्वस्त:कडे दुर्लक्ष करणं यामुळे हा रोग वाढत जातो. या रोगाची लक्षणं म्हणजे सुरूवातीला पांढरे पाणी अंगावरुन जाते. शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणं, रक्तमिश्रीत स्त्राव जाणं ही लक्षणं दिसतात. त्यामुळे खालील गोष्टी महिला करू शकतात. प्रत्येक स्त्रीने दर वर्षी स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तपासून गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे‌ निदान प्राथमिक स्वरुपात असतानाच करायला पाहिजेत म्हणजेच उपचार होऊ शकतील. पॅप स्मीअर नावाची अत्यंत सोपी आणि स्वस्त तपासणी केल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सुरुवातीलाच लक्षात येतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये. म्हणून सध्या लसीकरण उपलब्ध आहे. वयाच्या ११ वर्षापासून ते ४५ वर्षापर्यंत हे लसीकरण आपण घेऊ शकतो आणि सर्व ठिकाणी ते मिळू शकते. गर्भाशयाच्या कॅन्सरला एन्डोमेट्रीयल कॅन्सर असंही म्हणतात. यामध्ये अंगावरून जास्त रक्तस्त्राव जाणं हे लक्षण दिसतं. याचेही निदान लवकर करता येते. सोनोग्राफी केल्याने गर्भाशयातील अस्तर जाड झाले असेल तर छोटेसे ऑपरेशन करुन कळू शकते की कॅन्सर झाला आहे किंवा नाही आणि त्याप्रमाणे ऑपरेशन ठरवलं जातं. स्त्रीबीजाचे कर्करोग पाळीमध्ये अनियमितपणा किंवा अति रक्तस्त्राव, ओटीपोटात दुखणं असं दिसल्यास सोनोग्राफी केल्यास स्त्री बीजाचे निदान होऊ शकते. गर्भाशयाच्या आजारामध्ये जर साध्या गाठी असतील जसे फायब्रॉईडस किंवा स्त्री बीज मोठे झाले असेल तर किंवा अति रक्तस्त्राव होत असेल तर गर्भपिशवी काढून टाकल्यास आजार पूर्णपणे नाहीसा होतो. सध्याच्या काळात फायब्राईडसमुळे अतिरक्तस्त्रावामुळे गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण खूपच जास्त होत आहे. याबाबत सगळीकडे जनजागृती होत आहे तसंच सोनोग्राफी, सीटी स्कॅनसारखे तंत्रज्ञान सगळीकडे उपलब्ध असल्याने निदान लवकर होणं आणि स्त्र‌यिाही पुढे येऊन ऑपरेशन करुन घेतात. गर्भपिशवी काढण्याच्या अनेक पध्दती आहेत. प्रत्येक स्त्र‌यिांच्या गरजेप्रमाणे गर्भपिशवी कुठल्या पध्दतीने काढावी ते ठरवलं जातं. सध्या दुर्बिणीतून गर्भपिशवी काढण्याचं प्रमाण जास्त वाढत आहे. कारण या ऑपरेशननंतर रुग्ण लवकर बरे होतात. लवकर घरी जातात आणि त्यांच्या कामालाही सुरूवात करू शकतात. या ऑपरेशनमध्ये रक्तस्त्रावही खूप कमी होतो. कधी-कधी गर्भपिशवीचा कॅन्सर जास्त प्रमाणात झाला असेल तर मग ऑपरेशन करुनही काही उपयोग होत नाही आणि म्हणूनच गर्भाशयाच्या आजाराबद्दल प्रत्येक स्त्रीने जागरुकता पाळणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे लवकर निदान आणि लवकर उपचार होऊन आपले आयुष्य निरोगी आणि चांगले नक्कीच ठेवता येते.मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

from Maharashtra Times http://ift.tt/2lbHuGO

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s